Tuesday, 25 May 2021

आंबा पिकतो

 


तर, सकाळच्या पारी मस्त न्हा धोके तयार होवुन मास्क लावुन निघाले...बाजार एकदम ताजा तवाना आणि सुटसुटीत होता....आमच्याकडे शेजार पाजारच्या खेडेगावातुन खुप सगळ्या आदिवासी बायका भाजी घेउन येत असतात विकायला...एका मावशी कडे आंबे दिसत होते भरपुर...हापुस,बदामी आणि देसी आंबे....

तसंही यावर्षी उस्मानशेठ कडे आंब्याच्या सिजन ला सोकरी आणि जमाई ला जाता येणार नाही हे आता नक्की झालं त्यामुळे अजिबात घासाघीस न करता मिळाला त्या भावात आंबा खरेदी केला....
गालिब त्याच्या शायरी साठी मशहुर होता पण त्याला आंबा सुद्धा खुप आवडायचा, त्यावेळचा एक किस्सा ऐकला आहे, एकदा गालिब त्याच्या मित्राबरोबर झाडाच्या पारावर बसले होते समोरच एक आंबा पडला होता, रस्त्यावरुन जाणारं एक गाढव त्या आंब्याला हुंगुन पुढे निघुन गेलं,गालिब चा मित्र त्यांना म्हणाला, "देखीये गालिब साहब गधे भी आम नही खाते!" त्यावर गालिब शांत पणे हसुन त्याला म्हणाले, "बिल्कुल! गधेही आम नही खाते! "
फ़ळांचा राजा ची आठवण झाली की एक गोष्ट हमखास आठवते, गोरेगाव ला सगळी भावंडं जमली की आजोबा आंबे घेउन यायचे आणि मग पाण्यात घालुन ठेवलेले आंबे माचवुन रस काढण्याचं काम आमच्या कडे असायचं...आम्ही सगळे अक्षरश: त्या पातेल्या भोवती वर्तुळात बसुन आंबा माचवुन रस काढायचो....आणि हो! साल आणि कोय चोखुन साफ़ करणं हा एक बोनस असायचा....उन्हाळा म्हणजे आंबा, करवंद,भावंडांबरोबर दंगा आणि एकाच्या साथीने सगळ्यांना झालेले गालगुंड!
पुण्याला मुंबैला रत्नागिरी आणि देवगड हापुस शिवाय पायरी ह्याशिवाय बात नसायची...कधी मधी डोक्यावर टोपली घेउन एखादी कातकरी देशी बिटकी आंबे घेउन यायची...काय चव असायची त्या आंब्याची! झकास!
आता सिल्वासा ला आल्यापासुन केसर आणि वलसाड हापुस मणाच्या हिशोबाने आणले जातात...
गुजराती लोकांना तर हे फळ इतकं प्रिय आहे की रस काढून डीप फ्रीझर मध्ये ठेवण्याचा प्रघात खूप आढळतो...
तर असा हा आंबा... ह्याचा शिरा करा, खीरीत घाला आईसक्रीम करा किंवा मिल्कशेक बनवा पण हा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे धुवून डायरेक्ट तोंड लावून खाणे.. चिरणे वगैरे असे सोफिस्तिकेटेड उपचार करायला इथे तेवढा धीर हवा न! मग काय शुरू हो जाओ आप भी!
मधुवंती

Like
Comment

No comments:

Post a Comment