Sunday, 25 June 2017

सनबर्न!





सनबर्न म्हणजे रे काय भाउ?
गवताच्या गंजीवर गवत चघळत पडलेल्या बब्याला पिंट्याने प्रश्न विचारला.
बब्या थोडासा दचकलाच! ह्ये प्रकरन त्याच्यापर्यंत जाउन कसं पोचलं कळंना! गावाच्या वेशीवर होणारा हा कार्यक्रम त्याच्या ऐकीवात होताच!
आरं तुला कस्काय माहित?
पिंट्या: अरे ते च्यानल वाले बोंबलत व्हते नव्हं सनबर्न सनबर्न....मला वाटले ते परदेशी पोट्टया येतात नाई ट्यानिंग का काय ते करुन घ्याया
बब्या: ह्या ह्या ह्या ते सनबर्न नव्हं,आरं तो एक कार्यक्रम हाय त्या ईंग्रजांनी आनलेला! गाण्याचा म्युजिक शो म्हनं...
पिंट्या: अच्छा म्हणजे सवाई असतो तस्सा!?
बब्या: आरं न्हाई रं,त्यो आपली संस्क्रुती जपनारा कार्यक्रम आहे आनि हा निस्ताच धांगड्धिंगा!
पिंट्या: म्हंजी गनपती मधी आपन करतो तस्सा?
बब्या: आरं ती गनपती ची वरात असती! देवाची.....
आता कसं समजावुन सांगु तुला सनबर्न म्हणजे जिथे दारु आणि नाच गाणं चालतंय,
पिंट्या: म्हंजी आपन गणपतीच्या मिरवणुकीत करतो तस्सं??
बब्या: न्हाई न्हाई ! आपण तर मिरवणुक काढतो,ढोल ताशाच्या गजरात आपली संस्क्रुती हाय तशी! ह्यांचं म्हण्जे काहीतरी भलतीच गाणी लावुन त्यावर आचरट नाच चाललेला असतोय....
पिंट्या: हाहा म्हनजे आपन मिरवनुकीत करतोय तसा नागिन डांन्स?
बब्या: आरं ते आपल्या संस्क्रुती परमानं आपन करतो,ते तर तिथे दारु विकत्यात!
पिंट्या: ते तर आपणही करतो की दारुची पार्टी!नवीन वर्षाच्या दिवशी गडावर!
बब्या: आरं हाळु बोल! आपन आपल्या आनंदासाठी करतो.... आन ते पन आपली संस्क्रुती जपुन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी! पन ते रग्गड पैसा कमावतात
पिंट्या: आरं म्हनजी तर आपन करतोय तसच की! समदी वर्गणी कुठं जाते ह्या कामात,आन आपलं सामाजिक मंडळ दुसरं काम तरी कुठं काय करतं? सण संपला की मंडळ गायब!
बब्या: आरं अवघडच हाय बाबा आता कसं सांगु! आपलं जे काही चाल्तं ते परंपरेला जपन्यासाठी आनि ते जे काय करतात ते आपल्या संस्क्रुती चा नायनाट करण्यासाठी!
पिंट्या: अस्संय होय! मला तर वाटलं व्हतं तुला लई आवडेल हे सनबर्न! म्हुन तर दोन पास पन घेतलेत!पन नसल यायचं तर राह्यलं बापा! बघतो मी कोनी दुसरं मिळतं का!
बब्या: अरे! तुझ्याकडं पास हाय व्हय मंग असं सांग ना भाउ,येडा झाला का मला सोडुन जायला! चल जाउन बघुन तर येउ काय अस्तंय सनबर्न!
मधुवंती गोडसे
disclaimer: author does not support sunburn or any such so called festivals nor against it!! https://www.facebook.com/images/emoji.php/v7/f4c/1/16/1f642.png:)

हिंदी मिडीयम....हर घर की कहानी....

इंग्लीश सिर्फ़ एक भाषा नही एक ’क्लास’ है! असं म्हणत पोरीच्या इंग्रजी मिडीयमच्या प्रवेशाच्या फ़ेर्यात सापडलेल्या एका जोडप्याची ही कहाणी...खरतर आपल्या सगळ्यांचीच कहाणी....
सुरुवातीपासुनच ह्या चित्रपटातील नवरा बायको बरोबर आपण स्वत:ला relate करु लागतो...
आजकाल doctors चं racket आपल्याला माहितच आहे पण आजकाल सर्वात फ़ायदेशीर धंदा असेल तर बुवाबाजी आणि त्या खालोखाल शाळा काढणे....
राज आणि मिता त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या पिया च्या शाळा प्रवेशासाठी चिंतेत असतात,फ़ाईव स्टार होटेलसारख्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मग त्यांना काय काय उपद्वयाप
 करावे लागतात...आजकालची शिक्षण पद्धती आणि पोरांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची फ़रफ़ट....

सन २००८ मधे माधव साठी प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा आमची दोघांची अशीच अवस्था झाली होती, जी शाळा पसंत केली त्यामधेच प्रवेश मिळेल का, मग माधवची तोंडी परिक्षा आणि त्यात selection झाल्यावर पुढे प्रिंसीपल आणि ट्रस्टीज बरोबरचा माधव बरोबरचा आमचा पण selection interview! त्यात कौन कितने पानी मे हे जोखणारे प्रश्न... आणि काही अनावश्यक सल्ले अर्थात आम्हाला!त्यात माधव त्यांच्यासमोर काही बोलायलाच तयार नाही त्यामुळे तिथुन बाहेर पडल्यावर आम्ही हवालदिल झालो होतो की ह्याला admission मिळणार की नाही! ...शेवटी पहिल्याच यादीत माधवचं नाव पाहिलं आणि घोडं गंगेत न्हायलं असं झालं होतं आम्हाला!
तर  हे दोघं आपल्या सगळ्या चिंतातुर पालकांचं प्रतिनिधित्व करतात....
मग हिंदी मिडीयम मधे शिकणे हे ’घाटी’ आणि इंग्रजी मिडियम मधे शिकणं हे modern! मग ह्या शाळेसाठी नवीन घरात स्थित्यंतर तिथल्या standards शी match होण्यासाठी केलेली धडपड,मुलीची admission व्हावी म्हणुन पालकांची बौद्द्धिकं आणि प्रशिक्षण त्यातलं त्या counsellor वाक्य फ़ार गमतीशीर आणि सुचक सुद्धा you are late...people book me during pregnancy!

तर ही अशी तारेवरची कसरत करुन सुद्धा त्यांना admission मिळत नाही,कारण शाळांना वाटतं की मुलांचे पालक जास्त शिकलेले नसतील तर अशा मुलांना देखील प्रवेश देण्यात काही अर्थ नसतो...
मग एजंट्स गाठणे पैसे चारणे आणि प्रसंगी RTE (Right to Education) quota मधुन प्रवेशासाठी प्रयत्न!
आपण हे सगळं प्रत्यक्ष अनुभवत असतो आपल्या आजुबाजुला बघत असतो....पण कित्येक वेळा आपण हतबल असतो सगळं कळत असुनही आपण त्याच रस्त्याने जात असतो पोरांच्या भवितव्यासाठी प्रसंगी अनैतिक गोष्टी सुद्धा करत असतो....
चांगल्या शाळेत पोर जायला पाहिजे तर ते पुढे चांगल्या college मधे जाइल आणि चांगल्या college मधे गेला तरच चांगली नोकरी मिळेल...
त्यामुळे आजकाल सरकारी शाळा हा पर्याय चांगल्या मुलांसाठी नाहीच आहे असं काहीतरी चित्र निर्माण झालंय आणि ते दुर्दैवाने खरं देखील आहे! ह्या सगळ्या गोंधळानंतर हे जोडपं काय करतं ते बघण्यासारखं आहे.
इम्रान खान चा अभिनय तर उत्क्रुष्ट आहेच इम्रान खान प्रत्येक फ़िल्म मधे अधीकाधिक आवडत जातो....त्याने वेगवेगळे पैलु असलेल्या भुमिका घेउन कायमच आपलं वेगळेपण जपलं आहे.
 पण त्या बरोबरच लक्षात राहते ती consultant तिलोत्तमा शोम. तिचा अभिनय खुप सहज आणि भुमिकेला अगदी साजेसा झालाय.
मिता ची पिया बद्दलची excitement आणि तिचे डायलोग्ज मजा आणतात,दीपक डोब्रियाल सुद्धा छोट्याश्या रोल मधे छाप पाडुन जातो. सध्याच्या ह्या परिस्थिती मधे आपण कधी कधी हतबल होत असलो तरी हा चित्रपट बघुन स्वत:लाच त्या ठिकाणी ठेवुन पिक्चर मस्त एंजोय करता आलाय, शेवटचा संदेश कितीही चांगला असला तरी तो आचरणात किती जण आणतील हे मात्र सांगणं कठीणच!

मधुवंती