Tuesday, 25 May 2021

चांदोमामा...

 ए ... ए ....चांदोमामा... तूच.. तुच तर माझा एकुलता एक मामा.. परवाच माझी आई तुझ्याकडे आलेय असं आजी म्हणाली. मी तुझ्याकडे बघितलं तर फक्त एक ससा दिसतो... माझ्या आईचा पण चेहरा दिसेल ना रे तुझ्यात?किंवा माझा निरोप तुच सांगशील का माझ्या आईला? तिला सांग मी शहाण्या मुलीसारखी वागते आजीला, बाबांना त्रास देत नाही.. हट्ट करत नाही. आजी म्हणते आई मामा कडे गेली आहे पण मी मोठी झाले की येईल परत. बाबा म्हणतात मीच तुझी आई आणि बाबा...

माझी मैत्रीण म्हणत होती मला, आई फक्त आईच असते... तुझे बाबा तुझी आई कशी असेल? चांदोमामा... तूच सांग बरं? बाबा आई कसे होऊ शकतील? आई लहान मुलीला सोडून अशी जाते का तिच्या भावाकडे? तुझ्यावर मी रुसले आहे... एकतर माझ्या आईला माझ्याकडे पाठवून दे नाहीतर मला तरी तुझ्याकडे येऊ दे... आई शिवाय लहान मुलं कशी राहणार आणि मुलांशिवाय आई कशी........😥😥
मधुवंती

छोट्या मोठ्या मुलांना आपले आई बाप कोरोना मुळे गमवावे लागू नयेत... म्हणून सगळ्यांनी घरीच रहा...सुरक्षित रहा 🙏
May be an image of child





No comments:

Post a Comment