ती आणि तो आज किती वर्षांनी भेटत होते....
अधल्या मधल्या भेटी फारच तुटपुंज्या अर्ध्या मुर्ध्या आणि थोड्याशा अबोलच... पण गत
स्मृतींचा गंध मात्र त्या भेटी ना होताच....
ती ते गाव
सोडून गेली तेव्हा होती उणी पुरी ७ वर्षाची आणि तो तीच्याहूनही एक वर्षाने लहान...त्या
ठिकाणी आल्यापासून चां तिचा पहिला मित्र त्याच्या घरात किंवा तिच्या,दोघांचा
मुक्त वावर असायचा... घरामागे लागलेले आवळे तोडणे असो की मग घरासमोरच्या गार्डन
मध्ये झोके खेळणं असो दोघांनी ते बरोबरच करायचं असा एक अलिखित नियमच होता... एकदा सोसायटीच्या गेट टुगेदर मध्ये म्हणून
तिच्या आजीनी तिला सजवून तयार केलं होतं आणि गाणं शिकवलं होतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर मात्र तिने ते
गाणं म्हणणं साफ नाकारलं आणि त्याच्या बरोबर नेहमी करत असलेला नाच मात्र दोघांनी
मिळून झक्कास केला.
ती ला परत तिच्या गावी जावं लागलं आणि साश्रू
नयनांनी दोघांनी एकमेकांना निरोप दिला. पोरं आहेत छोटी सावरतील लवकरच असं
वाटणाऱ्या मोठ्यांना मात्र आश्चर्य वाटलं ते ह्यांची मैत्री किती दृढ होती
ह्याचं....
ती परत गेल्यावर त्याने त्याच्या वाढदिवसाचा
केक तिच्यासाठी खास पाठवला... अजूनही त्या केक चां वास तिच्या मनात दरवळतो आणि तो
अजुनही बालपणीच्या जादुई दिवसांना विसरलेला नाही. अधुन मधुन भेटतात तेव्हा परत
एकदा तेच आयुष्य जगण्याचा प्रयत्न ते करतात... आयुष्य बदललेल असलं तरी त्या
क्षणापुरते ते दोघं तसेच असतात छोटूकले एकमेकांचे जीवाभावाचे मित्र!
मधुवंती

No comments:
Post a Comment