’ओखी दिवस’
एखादाच दिवस असतो जेव्हा अचानक पाउस पडायला लागतो...उशिरा उठुन सुद्धा चहुदिशा अंधारलेल्या असतात...आपली तयारी असेल तरी बाहेर पडण्यासाठी पावसाची परवानगी नसते,आपण सुद्धा कोणत्यातरी बहाण्याचीच वाट पाहत असतो,एरवी अजिबात चहा न घेणारे आपण आज मात्र चहा साठी अजिबात आढेवेढे घेत नाही...त्याबरोबर काही गरमागरम खायला मिळालं तर अजुनच मजा... आज डाएट वगैरेचे नियम धाब्यावर बसवलेलेच असतात...
कामावर जाणं आपल्या हातात असलं की आपण ते आपसुकच लावुन घेतो आणि घरुन काम करण्याचा बहाणा करुन घरीच बसतो... अधुन मधुन बातम्यांचा वेध घेणं चालुच असतं काम नावालाच....
आसमंतामधे गारवा दाटलेला असतो...क्षणभर आपल्या माहेरचीच हवा असावी असं वाटतं....थोडी हुरहुरही लागते मग...जुन्या काही आठवणी पिंगा घालु लागतात...
दुपार सरत आलेली असते आणि गरमा गरम जेवुन आता डोळ्यावर सुस्ती चढायला लागते, त्यामधे बाहेरच्या हवेचा आणि नुकत्याच केलेल्या उन उन वरण भाताचा वाटा असतो, मग मांजरासारखं पाय पोटाशी घेउन झोपुन जातो ते एकदम चहाची तल्लफ़ येउनच जाग येते.
चहाचा घोट घेता घेता आपसुकच गारवा मधलं "पाउस दाटलेला..." गाणं लावलं जातं आणि आपण परत एकदा नोस्टेल्जिक होउन जातो....
संध्याकाळ सरते,टीवी वरच्या वादळाच्या बातम्या बघत आपण आवरासावरीच्या मार्गाला लागतो,घराच्या आणि मनाच्याही...
आजचा दिवस काहीसा तसाच होता...हो की नाही?

मधुवंती
गोडसे
Written on 5th December 2017
No comments:
Post a Comment