टु यु टु सुल्लु!
मै कर सकती है! तुमच्या आजुबाजुला बघा तुम्हाला अशा अनेक सुलु दिसतील
ज्यांच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे प्रत्येक गोष्ट हिरीहिरीने करायला त्यांना आवडते,थोड्या कमी शिकलेल्या पण तरी नवीन काम शिकणार्या,कितीही कष्ट पडले तरी ते सोसत काम करणार्या, आणि
तरीही हसत हसत वावरणार्या कधी त्यांच्यातल्या गुणांना वाव न मिळालेल्या अशा अनेक
सुलुं चं प्रातिनिधित्व करते आपली सुलोचना उर्फ़ सुलु.....
साधा नवरा आणि एक मुलगा आणि साधारण मध्यम वर्गीय कुटुंब या मधे सुलु खरंतर खुष
असते,आयुष्याकडुन खरंतर अजुन काही मिळवायची तडफ़ड
नाही जे आहे त्यात समाधानी,पण तरीही मी करु शकते असा विश्वास
असणारी सुलु....वडील आणि बहिणीं कडुन कमी शिकल्याबद्दल आणि घरी बसुन राहण्याबद्दल
कायमच टोमणे ऐकणारी सुलु, एका रेडियो स्टेशनची कोन्टेस्ट
जिंकल्याबद्दल बक्षीस घ्यायला गेलेली सुलु येताना आर जे बनण्याचं स्वप्न घेउन येते,त्यामागे सुद्धा नवर्याची बेभरवशाच्या प्रायवेट नोकरीची कटकट कमी करावी
असा देखील हेतु असतो,
सुलु आर जे बनते आणि मग मात्र तिच्या आकांक्षांना आभाळ मोकळं होतं,
पण असं काही होतं की ज्याने सुलु परत हादरुन जाते,
चमचा लिंबु शर्यतीत लिंबु कधीही पडु न देणारी सुलु आपल्या घराचा balance कसा
ढळु देईल? त्यासाठी मग तिची स्वप्न त्यागायला सुद्धा ती तयार असते,
पण सुलु के पास आयडियाज की कमी नही होती! दोन्ही बाजुंचा तोल सांभाळण्याचं काम
करण्यासाठी सुलु ला नवीन कल्पना सुचते आणि मग धम्माल!
ह्या चित्रपटात सर्वात जास्त काही आवडलं असेल तर उगाच स्त्री मुक्ती वगैरे चा
न आणलेला आव....सुलु चा फ़ंडा साधा सरळ असतो, चमच्यामधुन लिंबु कधी पडु द्यायचा
नाही!
विद्या बालन ने कायमच वेगवेगळ्या भुमिकांमधुन स्वत:ला सिद्ध केलय, या
चित्रपटात सुद्धा तिचा प्रसन्न आणि हसतमुख वावर मन जिंकुन जातो कुठलाही
स्त्रीमुक्ती वगैरे आव न आणता तिने साकारलेली सुलु बेस्टच,सपोर्टिंग मानव कौल
म्हणजेच सुलु चा नवरा अशोक,मुंबईची राणी मलिश्का आणि नेहा धुपिया यांच्या मालिका
सुद्धा मस्त!
मध्यंतरा नंतर चित्रपट थोडा रेंगाळतो, समथिंग मिसिंग असं थोडावेळ वाटतं पण ते
कदाचित सुरवातीलाच झालेल्या झंझावाती सुरुवातीमुळे असेल.
तुम्हारी सुलु लाईट मुड मधे घेउन जाण्यासाठी नक्कीच पहा!
मधुवंती

No comments:
Post a Comment