नेहमीप्रमाणे जिम मधे पोहोचले आज खरंतर कंटाळा आला होता पण व्यायाम करण्याचा वजन कमी होण्या व्यतिरिक्त अजुनही एक छान उपयोग होतो असं मला समजलंय....व्यायाम करत असताना फ़ील गुड हार्मोन्स जास्त काम करु लागतात असं वाचलंय म्हणुनच की काय खुप सकारात्मक विचार येतात आणि बर्याचदा काही समस्यांचं समाधानही मिळतं अचानक बंद दरवाजा खुल जाता है....
पुर्वी चालायला जेव्हा जवळच्या गार्डन मधे जायचे तेव्हा तर काय काय कविता सुचायच्या आणि काही thoughts! पण त्यावेळेस लिहायला काही नसल्यामुळे आज मराठी साहित्यस्रुष्टी एका महान कवयित्रीला मुकली आहे,
तर आज पण तसंच काहीसं होतं....
गेले बरेच दिवस मनात काही विषयांबद्दल विचार मंथन सुरु होतं, काही व्यक्तीविशेषांबद्दल आणि त्यांच्या वागण्यावरुन मन नाराज होतं.... त्यापेक्षाही त्याच त्याच गोष्टीचा विचार करुन माझं डोकं भणभणायला लागलं होतं आणि मीच व्हिलन आहे की काय असं मनोमन वाटायला लागलं,
ट्रेडमिल वर धावत असताना त्या विचारांनीच पिछा पुरवला इतका की स्पीड स्लो झाल्याने आपली गती कमी करावी हे कळलच नाही, थोडी अडखळलेच...
मग असं वाटलं की हे जे प्रोब्लेम्स आहेत आणि ज्यांच्यामुळे मन कलुषित होतं त्यांच्या बद्दल सारखा सारखा विचार करणं हे आपल्या तब्बेतीला घातक आहे.... I need to move on...do a favour on myself and forget it....
पण ते तसं घडणं शक्य असतं तर केव्हाच घडलं असतं....
जब वी मेट मधे गीत तिच्या जुन्या प्रियकराला शिव्या देते तसं करणं सुद्धा शक्य नव्हतं कारण ही माणसं तोडायची नव्हती ती तोडली जाउ शकत नाहेत ती आपल्या आयुष्यात होती आणि राहणार आहेत,आपण दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी ती कायमच आपल्या समोर येत राहणार या न त्या कारणामुळे....
मग काय करायचं....
ठरलं...एका पेपरवर सगळं लिहुन काढायचं सगळे राग द्वेश त्रासदायक संवाद सगळं सगळं....आणि मग ते फ़ाडुन दमणगंगेत टाकुन द्यायचं....get it out of my head...
त्रासदायक विचारांना तिलांजली देण्याचं काम करायचं....
बास....ठरलं...
आज थोड्या कैलरीज बरोबर डोक्यावरचं सुद्धा थोडं ओझं उतरलय....

No comments:
Post a Comment