Friday, 31 July 2015





२ वर्षांपुर्वीची गोष्ट,स्टोक कांगरी मोहिमेसाठी लेह ला गेले असताना, मोहिम पुर्ण झाल्यावर एक मोकळा दिवस असल्याने सिंधु नदीत राफ़्टिंग करायचं ठरवलं,राफ़्टिंग पोईंट पर्यंत पोहोचल्यावर ग्रुप ची ओळख झाली,बेल्जियमचं Wauter जोडपं,मेक्सिकोची Ana आणि जर्मनीतली Hudora त्याशिवाय इस्राएल च्या दोघी आणि मी अशी आमची टीम होती.
सगळे वेगवेगळ्या देशांचे असले तरीही राफ़्टिंग करता करता आपोआपच मोकळे होत गेलो, त्यात इस्राएली गाण्याने आणखी मजा आणली,इस्राएल मधुन आलेल्या त्या मुलीच्या मागोमाग आम्हाला कोणालाही कळत नसलेलं गाणं आम्हीही म्हणत होतो, हुडोरा हरिद्वार मधल्या एका एन जी ओ मधे volunteering करत होती,ते संपवुन लेह ला फ़िरायला आली होती. Ana धरमशाला इथल्या आश्रमात मेडिटेशन करायला आली होती. राफ़्ट वल्हवताना आजुबाजुचा परिसर रमणीय होताच,आमचं हे राफ़्टिंग सिंधु आणि झांस्कर नदीच्या संगमापाशी पुर्ण झालं आणि आम्ही सगळे दुपारच्या जेवणासाठी जवळच्या camp site वर गेलो,भारतीय बैठक घालुन जेवण करावं लागणार होतं,जेवण वाढल्यावर Ana आणि Hudora नेही व्यवस्थित मांडी घालुन हात जोडले ते बघितल्यावर मी त्यांना विचारलं, " Will you do prayer?" त्यावर Ana ने मला विचारलं, "Do you know any?" मी म्हटलं  येस, आणि हात जोडुन म्हणायला सुरुवात केली, "गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा, गुरु: साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरवे नम:"
संध्याकाळी लेह ला परतल्यावर कळलं तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा!

मला अजिबात कल्पना नसतानाही माझ्या तोंडुन ही प्रार्थना म्हटली गेली,कदाचित निसर्गरुपी गुरुनेच ती माझ्याकडुन म्हणवुन घेतली असावी,मी असं अजिबात म्हणणार नाही की चमत्कार झाला पण हा अनुभव थोडा वेगळा होता हे निश्चित!

3 comments:

  1. तू खुप छान लिहितेस. अगदी इथे बसुन rafting केल्याचा आनंद मिळाला. असाच blog वाचनाचा आनंद आम्हाला मिळत राहो हिच एक विनंती .

    ReplyDelete
  2. आयुष्य जगताना अनेक क्षण वहात असतात पण कधीकधी एखादा क्षण मनात आयुष्यभर आयुष्य होउन जातो..फक्त तो अनुभवताना टिपता येणे हे कौशल्य आहे...जे तुझ्याकडे आहे.तुझ्या आयुष्यातल्या 'त्या: एका क्षणाला तु शब्दात गुंफलेस पण त्या लेखनाने आम्हाला समृद्ध केले आहे..अशीच लिहिती रहा...

    ReplyDelete
  3. आयुष्य जगताना अनेक क्षण वहात असतात पण कधीकधी एखादा क्षण मनात आयुष्यभर आयुष्य होउन जातो..फक्त तो अनुभवताना टिपता येणे हे कौशल्य आहे...जे तुझ्याकडे आहे.तुझ्या आयुष्यातल्या 'त्या: एका क्षणाला तु शब्दात गुंफलेस पण त्या लेखनाने आम्हाला समृद्ध केले आहे..अशीच लिहिती रहा...

    ReplyDelete