Sunday, 16 August 2015

अश्रु



अश्रु सुद्धा आवश्यक असतात
जितके असते हास्यही
हसु आणि आसु
एकाच नाण्याच्या दोन बाजु
आयुष्यही असेच नाही का,
क्षणात हसु तर क्षणात आसु 

अश्रु कधी दु:खाचे
कधी सुखाचे सुद्धा
अश्रु कधी खचवणारे
कधी बनवतात मजबुतही

अश्रुंशिवाय हास्याची,
किंमत कधी कशी कळेल
अश्रुंशिवाय ह्रुदयाशी
नातं आपलं कधी जुळेल

संवेदना जेव्हा थेट
काळजाला जाउन भिडतात
जन्म होतो अश्रुंचा
आणि अश्रु वाहु लागतात

कधी काही हरवल्याचं दु:ख
कधी अपयशाचं
कधी जिंकुनही हारल्याचं
तर कधी हरुनही जिंकल्याचे

अश्रुंशिवाय आयुष्यात
सर्व काही व्यर्थ आहे
अश्रु आहेत म्हणुनच तर
या जगण्याला अर्थ आहे

दु:ख विसरुन जेव्हा 
सुखात आपण राहु लागतो
हास्याबरोबर आनंदी गाणी 
आपण गाउ लागतो

अश्रु तरी सुद्धा 
पाठ आपली सोडत नाहीत
खळखळुन हसताना
डोळ्यात अश्रु न येता
रहात नाहीत

अश्रु जेव्हा येतील तेव्हा
त्यांना अडवुन ठेवु नका
मनातल्या भावना
कोपर्यात ठेवु नका

अश्रु असतात
मन हलकं करण्यासाठी
दु:खाला सहन करुन
जगण्याची उमेद देण्यासाठी

अश्रु असे जेव्हा
डोळ्यात अचानक येतील 
लक्षात ठेवा दु:खी क्षण
क्षणात विरुन जातील

अश्रु असु दे डोळ्यात
म्हणु नका त्यांना नाही,
कारण,हेच देत असतात
आपल्या जिवंतपणाची ग्वाही!!


2 comments:

  1. फार सुंदर..मोत्याच्या ओळी अश्रूंसाठी..मधुवंती. दी ग्रेट.

    ReplyDelete
  2. फार सुंदर..मोत्याच्या ओळी अश्रूंसाठी..मधुवंती. दी ग्रेट.

    ReplyDelete