Thursday, 5 January 2017

रोजा

लहानपणीची आठवण....साधारण ९०-९२ साल असावं....परुळेकर शाळेतले दिवस ११ वाजताच्या शाळेसाठी १०.३० पर्यंत तरी निघावं लागे त्यादिवशी गुरुवार होता बाबांची सुट्टीचा दिवस....तेव्हा केबल सुद्धा नवीन होतं आणि केबलवाल्याकडुन दाखवल्या जाणार्या फ़िल्म्स चं अप्रुप वाटायचं...कारण तेव्हा आजच्यासारखे ढिगभर च्यानल्स नवते आणि थियेटर मधे जाण्याची सक्त मनाई!
त्यादिवशी केबलवाल्याने ’रोजा’ लावला होता,चित्राच्या बारिक आवाजात ’दिल है छोटासा...... बघुन झाल्यावर जड पायांनी निघावं लागलं होतं.....कारण पिक्चर सोडवत नवता पण शाळेला सुट्टीदेखील घेता येणार नवती.....मग काय चालत जाताना डोक्यात तेच विचार घोळत होते....पाउस जोरदार सुरु होता.....शाळेत जाण्याच्या उत्साहाचा आनंदच होता त्यात आज अजुनच मुड ओफ़ ची भर पडली होती.....
शाळेजवळ पोहोचत होतो आणि काही मुलं मुली परत येताना दिसली आणि मग नंतर बरीच.....आमच्या वर्गातली दिसल्यावर त्यांनी सांगितलं "वडगाव कामशेत ला खुप पाउस पडला आणि त्यामुळे लोकल्स बंद आहेत....तिथुन येणारी मुलं येउ शकणार नवती आणि त्यांची संख्या बर्यापैकी होती त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी दिली होती!!!!!
भोलानाथ ला कधी आर्जव केल्याचं आठवत तरी नाही पण तरी सुट्टी मिळाली!! आम्ही ज्या वेगाने चालत आलो होतो त्याच्या चौपट वेगाने धावत घरी निघालो.....परत उरलेला रोजा बघायला!!

No comments:

Post a Comment