मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!!
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा पाउस पडायला लागला आणि कोणितरी मला विचारलं कोणत्या भाषेचा अभिमान प्रमाणभाषेचा की बोलीभाषेचा?
हा प्रश्न कदाचित ज्ञानेश्वरांना देखील पडला असावा जेव्हा त्यांनी संस्क्रुत मधुन प्राकृत भाषेमधे ज्ञानेश्वरी लिहिली,लोकांनी त्यांची हेटाळणी केली असेल तरी त्यांनी मात्र माझ्या मराठीची काय बोलु कौतुके....अमृतातेही पैजा जिंके असं म्हणत मराठी ला सन्मान प्राप्त करुन दिला त्यानंतर कुसुमाग्रज,आरती प्रभु,कवी ग्रेस,महानोर आणि विंदा पाडगांवकरांनी देखील मराठीचा मान वाढवला.....ह्या मधे मराठी बोलीभाषा मात्र जिवंत राहीलीच....प्रांताप्रमाणे भाषा बदलते त्याप्रमाणे वर्हाडी,अहिराणी, आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशाजवळ राहणार्या लोकांची मराठी ह्यांनी देखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवुन ठेवलं....लोकांनी ह्या बरोबरच बंबईया मिंदी (मराठी+हिंदी) स्वीकारली तशीच पुण्याची शुद्ध तुपातली मराठी देखील अंगीकारली,
तरीही आज खरी मराठी बोलली जाते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात,
माझा जन्म जरी मुंबई मधे होउन पुण्यात शिक्षण झालं तरी इथल्या मावळी भाषेचे संस्कार आपसुकच माझ्यावरही झाले,वडीलांच्या विदर्भी पार्श्वभुमी मुळे अबे,काबे काय करुन राहिला! या वाक्यांचंही विशेष वाटलं नाही (इतर पुणेकरांना वाटतं तसं)
ट्रेकिंग करायला लागल्यापासुन खरंतर त्या त्या ठिकाणच्या बोलीभाषेबद्दल अजुन जवळीक वाटु लागली,आपण गावकर्यांच्या भाषेत बोललो की आपण त्यांना जास्त जवळचे वाटु लागतो याचा प्रत्यय आला आणि अशुद्ध बोलण्याची लाज न वाटता उलट खुपच मोकळेपणा वाटु लागला......आता सिल्वासाच्या आसपासच्या आदिवासी पाड्यांतुन फ़िरताना त्यांची वारली मराठी ऐकताना वेगळेपण जाणवत नाही, एखाद्या पोराने किंवा पोरीने, "तु काय करतोस?" असं विचारल्यावर राग येत नाही कारण त्यामागची खरी आणि निरागस भावना कळलेली असते....खरतर मराठी काय किंवा कोणतीही भाषा काय,बोलीभाषेच्या जितक्या जवळ तुम्ही जाल तितके त्या समाजाच्या जवळ तुम्ही पोहोचता.
आज कित्येक मराठी कुटुंबांना मराठीतुन बोलण्याची सुद्धा लाज वाटते,त्यांची मुलं आई ला आई न म्हणता मम्मी म्हणतात,आणि मराठी मधे conversation करणे त्यांना घाटी वाटतं तेव्हा त्यांची कीव येते आणि म्हणावसं वाटतं....तुम्ही तुमच्या भाषेचे,तुमच्या लोकांचे होउ शकला नाहीत दुसर्यांचे काय होणार!!आणि मराठी भाषा दिन एका दिवसापुरता न ठेवता ती कायम वापरात ठेवली पाहिजे!इस्त्रीवाल्या भाषेबरोबर आपली बोलीभाषाही तितकीच सन्माननीय आणि साजरी करायला हवी!!
मधुवंती

मराठी माणसाच्या अस्तित्वाची चालती बोलती खुण म्हणजे आपली मराठी...म_नात रा_ह्ण्याचे ठिकाण ज्या गोष्टीचे असते ती आपल्याला फार प्रिय असते.अशा भाषेबद्दल खुप सुंदर लिहिले आहेस.तुझे तिच्यावरील प्रेम व कळकळ संपुर्ण लेखनात दिसुन येतेय..लिहिती रहा..
ReplyDeleteमराठी माणसाच्या अस्तित्वाची चालती बोलती खुण म्हणजे आपली मराठी...म_नात रा_ह्ण्याचे ठिकाण ज्या गोष्टीचे असते ती आपल्याला फार प्रिय असते.अशा भाषेबद्दल खुप सुंदर लिहिले आहेस.तुझे तिच्यावरील प्रेम व कळकळ संपुर्ण लेखनात दिसुन येतेय..लिहिती रहा..
ReplyDeleteThank you anna! :)
Delete